
डोंबिवली, 22 मार्च (हिं.स.)।
पश्चिमकडील मोठागाव येथे राहणारे कुस्तीपटू सिद्धेश जितेंद्र पाटील याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून डोंबिवली शहराचा मान उंचावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डोंबिवलीकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कठोर मेहनत, जिद्द आणि अखंड सराव यांच्या जोरावर सिद्धेश याने हे यश संपादन केले आहे. या कर्तृत्वामुळे डोंबिवलीच्या क्रीडा परंपरेत मानाचा ठसा उमटवला आहे. या परिश्रमाचे मनापासून कौतुक करण्याकरता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ शिवसेना आमदार राजेश मोरे यासह काँग्रेस पदाधिकारी एकनाथ म्हात्रे व ग्रामस्थ मंडळ यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi