
पुणे, 22 मार्च (हिं.स.)।महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मिळकतकर भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी विविध क्षेत्रीय व संपर्क कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ हे ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने वर्षअखेर नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोयीस्करपणे मिळकतकर भरता यावा यासाठी महापालिकेअंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्रे व संपर्क कार्यालये ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. ही केंद्रे २९ मार्च २०२६ पर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.तर ३० व ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप मिळकतकराचा भरणा केलेला नाही, त्यांनी विहित मुदतीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु