
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।
माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून नांदेड - लातूर रोडवरील साईनगर धनगरवाडी येथे स्थापन करण्यात आलेल्या साईबाबा मंदिर कलेशारोहणचा आठवा वर्धापन दिन येत्या 26 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हभप श्री अच्युत महाराज दस्तापुरकर यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून याच दिवशी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले आहे. कलशारोहण वर्धापन दिन आणि किर्तन सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांनी केले आहे.
शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या धर्तीवर नांदेड सह मराठवाड्यातील साई भक्तांना नांदेड येथेच श्री साईबाबांचे दर्शन घेता यावे. त्यांचा आशीर्वाद मिळावा. यासाठी आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून साईनगर
धनगरवाडी येथे गेल्या आठ वर्षांपूर्वी श्री साईबाबा मंदिराची स्थापना करण्यात आली. शिर्डी येथील साईबाबाच्या मूर्तीची प्रतिकृती या ठिकाणी स्थापन करण्यात आली असून जाज्वल्य देवस्थान म्हणूनही अल्पावधीतच हे मंदिर भाविकांच्या पसंतीस उतरले आहे. या मंदिराचा कलिशारोहणाचा आठवा वर्धापन दिवस दिनांक 26 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद ही आयोजित करण्यात आला आहे. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी हरिभक्त परायण बालाजीराव पाटील मारताळेकर, ह भ प बालाजीराव झुंबाड, ह भ प बाबुराव केंद्रे, धनगरवाडीचे सरपंच अमित संजय पगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
आयोजित कीर्तन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण पाटील चिखलीकर, सौ प्रणिताताई देवरे - चिखलीकर बालाजी पाटील मारतळेकर, बाबुराव केंद्रे, बालाजी झुंबाड व अमित पगडे सरपंच धनगरवाडी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis