देगलूरच्या गुंडा महाराज मठात घुमणार प्रभू रामाचा जयघोष
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)। मानवतेचे प्रतीक आणि नीतिमत्तेचा आदर्श असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव यावर्षी देगलूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने २६ मार्च रोजी स्थानिक श्री राम मंदिर, गुंडा महाराज मठ येथे ह.भ.प. सद्गुरु
देगलूरच्या गुंडा महाराज मठात घुमणार प्रभू रामाचा जयघोष


नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।

मानवतेचे प्रतीक आणि नीतिमत्तेचा आदर्श असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव यावर्षी देगलूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने २६ मार्च रोजी स्थानिक श्री राम मंदिर, गुंडा महाराज मठ येथे ह.भ.प. सद्गुरु श्री. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून प्रभू रामाच्या जीवन चरित्रावर भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभू श्रीराम हे केवळ एक राजा नसून ते कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक बांधिलकी आणि अलोट राष्ट्रप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लाखो वर्षे उलटूनही त्यांचे चरित्र

आजही समाजासाठी तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. विशेषत धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती या पुरुषार्थांचा समतोल कसा साधावा, याचे उत्तम दर्शन रामचरित्रातून घडते. याच उद्बोधक विषयावर चंद्रशेखर महाराज प्रकाश टाकणार आहेत.

हा सोहळा गुरुवार, दि. २६ मार्च रोजी संपन्न होईल. सायंकाळी ६ वाजता सामूहिक हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पठणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुख्य व्याख्यानाला प्रारंभ होईल. तरी देगलूर परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राम मंदिर गुंडा महाराज मठ संस्थान व देगलूरच्या भाविकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande