
अमरावती, 22 मार्च (हिं.स.)।
मुंबई येथील एमडी ड्रग्ज तस्करासह शहरातील तस्कराला लालखडी ते नवसारी मार्गावर एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देताना गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक व त्यांच्या ताब्यातून ११ लाख ७९फ हजार रुपयांची ७८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे. अजिम असद शेख (वय ३६ रा. माहिम दर्याच्या मागे, माहिम वेस्ट मुंबई) आणि शेख समीर शेख आमीर (वय २५ रा. गवळीपुरा, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने ८ फेब्रुवारीला चार आरोपींना अटक व २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त केली होती. त्यानंतर बडनेरा विश्रामगृहालगत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ७६ ग्रॅम एमडी जप्त केली होती. या दोन्ही गुन्ह्यात सखोल तपास केल्यानंतर मुंबई येथील काही युवक शहरातील एमडी तस्करांना स्वतः एमडी आणून देत असल्याचे उघड झाले. दरम्यान मुंबई येथील तस्कर आजिम अमद शेख शनिवारी शहरातील एकाला एमडी देण्याकरिता येत असल्याची टिप मिळाली. सायंकाळी आजिम हा लालखडी ते नवसारीमार्गावर उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. काही वेळाने एका ऑटोरिक्षामध्ये शेख समीर आला. दोघे एमडीची डिलिव्हरी करीत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील ७८ ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करीत दोघांना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी