मराठवाड्यात अवकाळी पाऊस-गारपिटीने ११,५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च (हिं.स.)। मराठवाड्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ११,५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे २०,००० हून अधिक शेतकरी संकटात सापडले आहेत छत्रपती संभाजीनगर, जा
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च (हिं.स.)।

मराठवाड्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ११,५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे २०,००० हून अधिक शेतकरी संकटात सापडले आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील ५०० हून अधिक गावांना याचा फटका बसला असून, यामध्ये २ जणांचा मृत्यू आणि ४१ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बाधित क्षेत्र : अंदाजे ११,५७२ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, हळद आणि फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. सर्वाधिक फटका बसला .छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. मराठवाड्यात रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बीड, वाशी, परभणी, जालना, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या गारा पडल्यामुळे शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. यामुळे कष्टाने पिकवलेला रब्बी हंगाम अवघ्या काही तासांत मातीमोल झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील अनेक भागात काल दुपारी आणि पुन्हा रात्री, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपपीट झाली आहे. वीज पडून पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, प्रशासनाकडून या नुकसानीचे तातडीने पंचंनामे करून घेऊन शासनाने आवश्यक ती मदत जाहीर करावी अशी मागणी आहे.

वादळी पाऊस आणि गारपिटी झाल्यामुळे मागच्या संकटातून वाचलेल्या आणि हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू , हरभरा, करडई ही पिके जमीनदोस्त झाली आहेत, आंबा आणि द्राक्ष या फळबागांचे नुकसान झाले आहे, भाजीपाल्यांची नासाडी झाली आहे, शासनाने तातडीने या नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश द्यावेत, नुकसानीचे स्वरूप लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षासह विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande