
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।
नागपूर येथील संघ मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लोहा, कंधार तालुक्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे राहावे, असे आवाहन लोहा येथील ज्येष्ठ मार्गदर्शक बी. बी. गायसमुद्रे यांनी केले.
त्यांच्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरएसएस संघटनेने पदावर बसवले असून, आता संघटनेने त्यांना पदावरून दूर करावे, असे निवेदन मोर्चादरम्यान दिले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis