आयपीएल २०२६: राजस्थाननंतर आरसीबीची विक्री
-१६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली फ्रँचायझी-आदित्य बिर्ला ग्रुपसह चार कंपन्यांनी आरसीबी घेतली विकत नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.)आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन पर्पेच्युअल प्रायव्हेट लि
आरसीबी


-१६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली फ्रँचायझी-आदित्य बिर्ला ग्रुपसह चार कंपन्यांनी आरसीबी घेतली विकत

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.)आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन पर्पेच्युअल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे आयपीएलचे गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विकत घेतले आहेत. मंगळवारी राजस्थान रॉयल्सलाही नवीन मालक मिळाला आणि त्यानंतर आरसीबीच्या मालकी हक्कात बदल झाल्याची बातमी समोर आली. या चार कंपन्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडसोबत एक निश्चित करार केला आहे, ज्यामध्ये आरसीबीच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांचा समावेश आहे. आरसीबीला १६.७०६ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे.

नवीन मालकी हक्कानुसार, आर्यमन विक्रम बिर्ला हे अध्यक्ष असतील, तर टाइम्स ऑफ इंडियाचे सत्यन गोस्वामी हे फ्रँचायझीचे उपाध्यक्ष असतील. ही अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेली नाही. यासाठी आयपीएल आणि डब्ल्यूपीएलची नियामक संस्था असलेल्या बीसीसीआय, भारतीय स्पर्धा आयोग आणि संबंधित संस्थांची मंजुरी आवश्यक आहे. कुमार मंगलम बिर्ला यांचे म्हणाले की, गेल्या दोन दशकांत, आयपीएल एक क्रीडा शक्ती म्हणून उदयास आली आहे, जिने भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तन घडवले आहे. सध्या, आरसीबी ही एक उत्कृष्ट फ्रँचायझी आहे, जी आदित्य बिर्ला समूहाला जागतिक क्रीडा क्षेत्रात आपला वारसा विस्तारण्याची संधी देते. आम्हाला त्याचे मालक झाल्याचा आनंद आहे.नवीन अध्यक्ष आर्यमन बिर्ला म्हणाले की, या फ्रँचायझीशी जोडले जाणे हा त्यांच्यासाठी एक सन्मान आहे. ते म्हणाले, आरसीबीच्या पुढील टप्प्यात परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र येणे हा एक सन्मान आहे. ही भागीदारी मीडिया, क्रीडा आणि ग्राहक व्यवसायांची सखोल समज एकत्र आणते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande