न्यूझीलंडच्या महिला संघाने द. आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका ४-१ ने जिंकली
क्राइस्टचर्च, २५ मार्च (हिं.स.)अमेलिया केरच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने पाचव्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९२ धावांनी विजय मिळवून मालिका ४-१ ने जिंकली. हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केरने ५५ चेंडूंमध्ये १०५ ध
अमेलिया केर


क्राइस्टचर्च, २५ मार्च (हिं.स.)अमेलिया केरच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने पाचव्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९२ धावांनी विजय मिळवून मालिका ४-१ ने जिंकली. हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केरने ५५ चेंडूंमध्ये १०५ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि दोन विकेट्सही घेतलया्. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेलिया केरला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, ज्यात इसाबेला गेज लवकर बाद झाली. त्यानंतर अमेलिया केर आणि जॉर्जिया प्लायमर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. तुमी सेखुखुनेने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या. पण केरने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.

अमेलिया केरने सुने लुस आणि तुमी सेखुखुने यांच्या गोलंदाजीवर सलग चौकार मारून धावगती वाढवली. त्यानंतर तिने ब्रुक हॅलिडेसोबत ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. केरने शेवटच्या षटकांमध्ये झटपट धावा केल्या आणि संघाला २० षटकांत १९४/६ पर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेसाठी आयाबोंगा खाका आणि तुमी सेखुखुने यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेची धावांचा पाठलाग करताना सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. लीया ताहुहू आणि सोफी डिव्हाईन यांनी पॉवरप्लेमध्ये संघाच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले, ज्यामुळे संघाची अवस्था ४० धावांवर चार गडी अशी बिकट झाली. अनेरी डर्कसनने २३ धावा करून झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण तीदेखील अमेलिया केरच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर इतर कोणताही फलंदाज डाव टिकवू शकला नाही आणि संघ २० षटकांत केवळ १०२/९ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande