आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती
कोलकाता, 25 मार्च (हिं.स.)तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संघ व्यवस्थापनाने स्फोटक फलंदाज रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती केली असून, अजिंक्य र
रिंकू सिंग


कोलकाता, 25 मार्च (हिं.स.)तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संघ व्यवस्थापनाने स्फोटक फलंदाज रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती केली असून, अजिंक्य रहाणे कर्णधारपदी कायम राहील हे स्पष्ट केले आहे. रिंकूला उपकर्णधारपदी नियुक्त करण्याच्या निर्णयावरून असे दिसून येते की, फ्रँचायझीने दीर्घकालीन नेतृत्व योजनेसह पुढे वाटचाल केली आहे.

आगामी आयपीएल हंगामापूर्वी, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, उपकर्णधार म्हणून रिंकू कर्णधार रहाणेसोबत मिळून काम करेल. संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक, अभिषेक नायर यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. नायर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी त्याला एक लीडर म्हणून विकसित होताना पाहिले आहे. संघ नेहमीच त्याच्याकडे आशेने पाहतो. आम्हाला रिंकूला काही जबाबदारी द्यायची आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, मला वाटते की ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. रिंकूचा प्रवास अविश्वसनीय राहिला आहे. त्याला २०१८ मध्ये ८० लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते, पण केकेआरने त्याला आयपीएल २०२५ मध्ये १३ कोटी रुपयांना कायम ठेवले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या षटकात पाच चेंडूंवर पाच षटकार मारून रिंकूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कामगिरीमुळे तो केवळ स्टारच बनला नाही, तर भारतीय संघात त्याचे स्थानही निश्चित झाले. आज रिंकूला फिनिशर म्हणून ओळखले जाते.

हंगामापूर्वी केकेआरने कोलकाता येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान रहाणे आणि रिंकूला एकत्र मंचावर बोलावण्यात आले. जेव्हा रिंकू मंचावर आला, तेव्हा काही चाहत्यांनी त्याला कर्णधार बनवण्याची मागणी केली. यावरून केकेआरमधील रिंकूची प्रचंड लोकप्रियता दिसून येते. या कार्यक्रमात केकेआरचा संपूर्ण संघ उपस्थित होता. वेगवान गोलंदाज सौरभ दुबेला मंचावर बोलावून चाहत्यांना त्याची ओळख करून देण्यात आली. दुखापतग्रस्त आकाश दीपच्या जागी सौरभ संघात सामील झाला आहे. केकेआर आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande