बीड : जातेगावात मुक्कामी बसमधून ८० लीटर डिझेल चोरले
बीड, 27 मार्च (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे गेवराई जातेगाव मुक्कामी बस गावातील यमाई देवीच्या मंदिरासमोर लावली असता चोरांनी बसच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून ८० लीटर डिझेल चोरी गेल्याचा प्रकार चालक-वाहकाच्या निदर्शनास आला. बसचालक काकडे आण
बीड : जातेगावात मुक्कामी बसमधून ८० लीटर डिझेल चोरले


बीड, 27 मार्च (हिं.स.)।

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे गेवराई जातेगाव मुक्कामी बस गावातील यमाई देवीच्या मंदिरासमोर लावली असता चोरांनी बसच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून ८० लीटर डिझेल चोरी गेल्याचा प्रकार चालक-वाहकाच्या निदर्शनास आला.

बसचालक काकडे आणि वाहक पवार हे कर्तव्यावर होते. यमाई देवी ट्रस्टच्या इमारतीमधील ऑफिसमध्ये ते झोपलेले होते.

एम. एच. २० बी. एल. १७५९ या क्रमांकाच्या बसमधील डिझेल चोरांनी रातोरात लांबवले आहे. या प्रकरणी जातेगाव सरपंच बंडू नाना पवार यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. जातेगाव बिटचे बिट अंमलदार नारायण काकडे यांनी पंचनामा केला आहे. बिट अंमलदार नारायण काकडे हे तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande