

नाशिक, 27 मार्च, (हिं.स.)। गेल्या दोन दिवसांपासून प्रसार माध्यम व समाज माध्यमांवर कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा अत्यंत विकृत व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमुळे राज्याचे व नाशिक जिल्ह्याचे राजकारण दूषित झालेला आहे. नाशिक जिल्ह्याचा अपमान या विकृत प्रवृत्तीमुळे होतो आहे अशा अपवित्र विकृतीला येणारा कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या कुठल्याही बैठकींना बोलू नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा तसेच भोंदू बाबा खरात या विकृतीमुळे अनेक महिला भगिनींचा शोषण करण्यात आलेले आहे यामुळे अनेक परिवार उदध्वस्त होत आहेत. झिरवळ आणि खरात या प्रवृत्तीमुळे नाशिक जिल्हा बदनाम होतो आहे. त्यामुळे या प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. भोंदू बाबा खरात याच्या संपर्कात आलेल्या राजकीय असतील प्रशासन अधिकारी असतील व इतर कोणी या गुन्ह्यांमध्ये जर सामील असेल तर त्यांना त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी व त्यांची कसून चौकशी व्हावी असे निवेदन नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
एसआयटी समिती व पोलीस आयुक्तालय यांच्या चौकशीमध्ये कुठल्याही राजकीय दबाव नसावा त्यांना पूर्णपणे मोकळीक देऊन ही चौकशी झाली पाहिजे व गुन्हेगारांना त्वरित शासन व्हावे असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिनेश बच्छाव, नाशिक जिल्हा एन एस यू आय चे अध्यक्ष अल्तमश शेख, नाशिक शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जावेद इब्राहिम, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वनीता मुलाने, नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तन्वीर तांबोळी, नाशिक मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, नाशिक शहर काँग्रेस आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, मुस्ताक शेख, कुसुमताई चव्हाण, फारूक मन्सुरी, फारुक कुरेशी, प्रकाश माळी, अण्णा मोरे, देवराम सैंदाणे, गुड्डी खान, शिवाजी गंभीरे, आदित्य बोरसे, इसाक कुरेशी, सुनील राजपूत, रवी काळे, संतोष हिवाळे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV