
बीड, 27 मार्च (हिं.स.)।
बीड तालुक्यातील चौसाळा येथील
हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान हजरत चंदन शहावली देवस्थानच्या उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. २८) दुपारी २ ते ५ दरम्यान कुस्त्यांचा जंगी फड रंगणार आहे. अंतिम कुस्ती ११ हजार १११ रुपयांची होणार असून, विजयी मल्लास चांदीची गदा देण्यात येणार आहे. रविवारी (दि. २९) सायंकाळी शुभांजली थोरात यांचा लावण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मैदानावर होणार आहे.
उरुसानिमित्त कार्यक्रमांचा भाविकांनी लाभघ्यावा. तसेच चौसाळा परिसरातील मल्लांनी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, उपाध्यक्ष अरबाज मुलानी, सचिव प्रसाद देशमुख, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis