अमरावतीत तापमान ४१ अंशांवर , दुपारी रस्त्यावर शुकशकाट
अमरावती, 27 मार्च (हिं.स.) :अमरावती शहरात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढली असून तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. गुरूवारी शहरात कमाल तापमान थेट ४१ अंशापर्यंत पोहचले आहे. २३ मार्चला ३८ अंश तापमान होते. याचाच अर्थ अवघ्या तीन दिवसात पाऱ्याने
उष्णतेचा तडाखा; तापमान ४१ अंशांवर तीन दिवसात तापमान ३ अंशाने वाढले : दुपारी रस्त्यावर शुकशकाट


अमरावती, 27 मार्च (हिं.स.) :अमरावती शहरात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढली असून तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. गुरूवारी शहरात कमाल तापमान थेट ४१ अंशापर्यंत पोहचले आहे. २३ मार्चला ३८ अंश तापमान होते. याचाच अर्थ अवघ्या तीन दिवसात पाऱ्याने थेट ३ अंशाने उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत चालला असून नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण होत आहे. गुरूवारी तर सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती, दुपारी तर उन्हाच्या असह्य झळा आज जाणवत होत्या.वाढलेल्या उष्णतेमुळे दुपारच्यावेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी अनेकजण टोपी, गॉगल, रुमाल, दुपट्ट्यांचा वापर करताना दिसत आहेत. दरम्यान, उष्माघाताचा घोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि शक्यतो उन्हात जाणे प टाळणे, असे सल्ले दिले जात या आहेत. २९,३० मार्चला ढगाळ हवामानाची शक्यता आगामी दोन दिवस अशाचप्रकारचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे तापमान आहे त्यापेक्षा थोडे फार वाढण्याची शक्यता आहे. तसेच २९, ३० मार्चला जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande