रामनामाच्या जयजयकाराने दुमदुमली अंबानगरी
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)जय.. जय... श्रीराम..मेरे राम आये है... अशा जयजयकाराने तसेच ढोल-ताशे... डीजेच्या तालाने गुरुवारला सायंकाळपासून संपूर्ण अंबानगरी दणाणून गेली होती. श्रीराम नवमीच्या निमित्ताने गुरुवारला नेहमीप्रमाणे विश्व हिंदू परीषद व बजरंग
जय.. जय.. श्रीराम ... जयजयकाराने अंबानगरी दुमदुमली  सीताराम बाबा मंदिर ते गांधी चौकापर्यंत जोरदार जल्लोष


अमरावती, 27 मार्च (हिं.स.)जय.. जय... श्रीराम..मेरे राम आये है... अशा जयजयकाराने तसेच ढोल-ताशे... डीजेच्या तालाने गुरुवारला सायंकाळपासून संपूर्ण अंबानगरी दणाणून गेली होती. श्रीराम नवमीच्या निमित्ताने गुरुवारला नेहमीप्रमाणे विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाचे वतीने बालाजी प्लॉट येथील सीताराम बाबा मंदिरापासून सायंकाळी भव्य शोभायात्रा निघाली. सीताराम बाबा मंदिर ते गांधी चौकापर्यंत निघालेल्या या भव्यदिव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. विशेष म्हणजे शोभायात्रेतील देवदेवतांच्या आकर्षक झाँकींनी अमरावतीकरांचे लक्ष वेधले.

वेगवेगळ्या प्रकारच्या झाँकीयांनी सजलेले विविध भागातून ट्रॅक्टर राजापेठ परीसरात निघाले आणि बालाजी प्लॉट सीताराम बाबा मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. मिरवणुकीत विविध गट, आकर्षक चित्ररथ, देवीदेवतांच्या झाँकीयासह मोठ्या संख्येने भाविक या शोभायात्रेत सहभागी - झाले होते. शोभायात्रा मिरवणूक सायंकाळी बालाजी प्लॉट येथून सुरू होऊन गद्रे चौक, कुथे बस स्टॉप, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, जवाहर गेट, साबनपुरा रोड मार्गे गांधी चौकात पोहोचली मध्यरात्री १२ वाजता समारोप झाला.बालाजी प्लॉट, हमालपुरासह शहरातील विविध भागात रामनवमी निमित्त शोभायात्रा निघाल्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे ०३ पोलीस उपायुक्त, ३ सहा. पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ७० सपोनि / पोउपनि व १२५० पोलीस अंमलदार यांचेसह आरसीपी व क्युआरटी पथक तसेच राज्य राखीव पोलीस दलाची ०१ कंपनी व ३०० पुरुष होमगार्डस बंदोबस्तावर तैनात होते. नागरीकांच्या सुरक्षिततेकरीता १४ सी आर मोबाईल १० दामिनी पथके, बीट मार्शल व डायल ११२ ची वाहने ही शहरात सतत गस्त घालत होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande