बीड - भायाळा येथे महायज्ञ सोहळ्यास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट
बीड, 27 मार्च (हिं.स.)।पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे अखंड हरीनाम नारळी सप्ताह आणि पंचकुंडी महायज्ञ सोहळ्यास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी इंदुवासिनी संस्थानचे महंत महामंडलेश्वर त्रिविक्रमानंद शास्त्रीज
Q


बीड, 27 मार्च (हिं.स.)।पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे अखंड हरीनाम नारळी सप्ताह आणि पंचकुंडी महायज्ञ सोहळ्यास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी इंदुवासिनी संस्थानचे महंत महामंडलेश्वर त्रिविक्रमानंद शास्त्रीजी यांचे शुभाशीर्वाद घेतले.

प्रारंभी ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने भव्य स्वागत केले, त्यांचे हे आदरातिथ्य अविस्मरणीय होते. भायाळा ग्रामस्थांच्या या प्रेमाची उतराई होता येणार नाही. यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या लोकांमुळे मी आज इथपर्यंत आले आहे. समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या जीवन कष्टमुक्त व्हावे म्हणून मुंडे साहेबांनी आयुष्यभर कार्य केले, मी देखील त्यांना अपेक्षित कार्य करून तुमच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande