ज्वारीचे क्षेत्र घटले; गरिबांची भाकरी महागणार
बीड, 27 मार्च (हिं.स.)।बीड परिसरात एकेकाळी ''रब्बीचे कोठार'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या पिकात मोठी घट झाली आहे.वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि हवामानातील बदल यांमुळे शेतकरी ज्वारी ऐवजी बागायती पिकांकडे वळला आहे. परिणामी, मागील चार
ज्वारीचे क्षेत्र घटले; गरिबांची भाकरी महागणार


बीड, 27 मार्च (हिं.स.)।बीड परिसरात एकेकाळी 'रब्बीचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या पिकात मोठी घट झाली आहे.वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि हवामानातील बदल यांमुळे शेतकरी ज्वारी ऐवजी बागायती पिकांकडे वळला आहे. परिणामी, मागील चार वर्षांत तब्बल १ हजार ५० हेक्टरवरीलज्वारीचे क्षेत्र घटले असून, भविष्यात गरिबांची भाकरी महागण्याचे चित्र दिसत आहे. सन २०२० पासून पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांनी फळबागा, पालेभाज्या आणि ऊस लागवडीला पसंती दिली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी ऐवजी मक्याचे उत्पादन घेतले जात आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, पिंपळनेर परिसरात सध्या विविध पिकांची लागवड झाली असून, त्यात ज्वारीचे प्रमाण अत्यंत निरुत्साहजनक आहे.

सध्या बाजारात ज्वारीचा किरकोळ दर ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो आहे. सिंचन सुविधांमुळे नगदी पिकांकडे वाढलेला ओढा आणि घटते कोरडवाहू क्षेत्र यामुळे ज्वारीची खळी आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande