श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला मिडसांगवी येथे प्रारंभ
बीड, 27 मार्च (हिं.स.)। शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड संस्थान, निमगाव येथील गुरु स्वामी निगमानंद महाराज यांनी सुरू केलेल्या ४८ व्या वार्षिक फिरत्या नारळी सप्ताहाला मिडसांगवी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून सुरुव
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला मिडसांगवी येथे प्रारंभ


बीड, 27 मार्च (हिं.स.)।

शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड संस्थान, निमगाव येथील गुरु स्वामी निगमानंद महाराज यांनी सुरू केलेल्या ४८ व्या वार्षिक फिरत्या नारळी सप्ताहाला मिडसांगवी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून सुरुवात झाली आहे.

सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गीता पाठ, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, रामायण कथा, प्रवचन, हरिकीर्तन, जागर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संतोषमहाराज शास्त्री, सुरेशानंद महाराज, शंकर महाराज शास्त्री, रामेश्वर महाराज शास्त्री, रामगिरी महाराज शास्त्री, हनुमान चैतन्य शास्त्री यांचे प्रवचन तर डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, केशव आप्पा नामदास, उल्हास महाराज शास्त्री, सत्यवान महाराज लाटे, रामेश्वर महाराज शास्त्री भोजने, पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार आहे.

रामायणाचार्य उद्धव महाराज चोले यांची तुळशी रामायण कथा सुरू आहे. येत्या ३० मार्च महंत स्वामी जनार्दन महाराज गुरू निगमानंद मच्छिंद्रगड यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande