
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)
शेताच्या मोटारपंपावर लागलेला केबल चोरुन त्यातील तांबातार वेगळा करुन विक्री करणाऱ्यास गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्याने एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शेख अझररुद्दीन शेख कमरुद्दीन याने नवीन घराचे बांधकाम सुरू असताना, त्या घरातून इलेक्ट्रीक केबल लंपास केला. तो जाळून तांबातार वेगळा काढून त्याची विक्री केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, संशयिताने खोलापुरीगेट हद्दीतील केबलचोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार जहीर खान उर्फ राजा नाडा वल्द जमीर खान (अमरावती) व शेख अबरार उर्फ येडा शेख मुक्तार (रा. गुलजारनगर, अमरावती) यांनी मिळून तीन ठिकाणी केबलची चोरी केली होती. तो तार विकून तांबा काढून जवाहरगेट येथील एका दुकानात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदर दुकान मालकाकडून १२ किलो तांबातार जप्त केला आहे. यातील संशयित जहीर खान उर्फ राजा नाडा वल्द जमीर खान व शेख अबरार उर्फ येडा शेख मुक्तार अशी दोघे अद्याप फरार आहे. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, नाझीमोद्दीन सय्यद, रणजीत गावंडे, प्रभात पोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नमुद तिघांविरुद्ध तीन गुन्हेही दाखल होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी