
बीड, 28 मार्च (हिं.स.)।
'हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवू या' या ब्रीदवाक्याला स्मरून आणि हिंदू समाजामध्ये जाज्वल्य धर्माभिमान व संघटन शक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने बीड शहरात येत्या रविवारी, २९ मार्च रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. धोंडीपुरा येथील टिळक रोड भागात होणाऱ्या या संमेलनासाठी जिल्हाभरातून मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
या निमित्ताने शहरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू संमेलन समिती, धोंडीपुरा वस्ती यांच्या वतीने या ऐतिहासिक
धोंडीपुरा भागात भव्य शोभायात्रेचे नियोजन
सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विराट संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे लाभणारे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असणार आहे. यामध्ये यज्ञभूमी गंगाखेडचे सोमराज यज्ञेश्वर महाराज सेलुकर हे उपस्थित राहून उपस्थितांना आशीर्वचन देणार आहेत. त्यांच्यासोबतच थोरले पाटांगण संस्थानचे मठाधिपती विनायक महाराज पांटगणकर आणि धर्मजागरण संयोजक (जालना विभाग) लक्ष्मणराव
बहिरवाळ यांचेही प्रबोधन लाभणा-आहे. या संपूर्ण सोहळ्याचे अध्यक्षस्थान उद्योजक युवराज कोळपकर भूषविणार आहेत सायंकाळी ५ वाजता दत्त मंदिर सुभाष रोड येथून या शोभायात्रेल दिमाखात सुरुवात होईल. ही यात्र शहरातील मुख्य मार्गावरून जात संमेलन स्थळी म्हणजे धोंडीपुर टिळक रोड येथे विसर्जित होईल या शोभायात्रेत पारंपरिक वाद्ये लेझीम पथके आणि भगवे ध्वज घेऊन हजारो हिंदू बांधव सहभार्ग होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis