
लातूर, 28 मार्च (हिं.स.)। अभाविपच्या लढ्याला यश मिळाले असून सीईटी सेलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २७ मार्च रोजी बी.एड. सीईटीच्या सकाळच्या सत्रातील परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असून कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. परीक्षेचा सुधारित दिनांक व प्रवेशपत्राची माहिती ई-मेल व एसएमएसद्वारे येईल. परीक्षा २८ किंवा २९ मार्च रोजी होणार आहे. कळविण्यात
परभणी येथील एमजीएम अकॅडमी, येथे आयोजित एमएचटी-सीईटी (बी. एड.) परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्यांचे संगणकअचानक बंद पडल्यामुळे परीक्षा वेळेत सुरू होऊ शकली नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेते परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली तसेच केंद्र प्रशासन आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांना निवेदन देण्यात आले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis