नॅशनल टेक्नीकल स्टुडंटस असोशियन NTSA संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी अनिल पाटील धमने
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। अनिल पाटील धमने हे गेल्या २८ वर्षा पासून विविध पक्ष संघटनेत सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून त्यांना सर्व क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्या मुळे त्याच्या आजवर केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन NTSA संघटनेचे संस्थापक अध्
नॅशनल टेक्नीकल स्टुडंटस असोशियन NTSA संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी अनिल पाटील धमने


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। अनिल पाटील धमने हे गेल्या २८ वर्षा पासून विविध पक्ष संघटनेत सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून त्यांना सर्व क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्या मुळे त्याच्या आजवर केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन NTSA संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिटलर भोसले यांच्या आदेशानुसार त्यांच्या सही निशी प्रदेशाध्यक्ष भास्कर हंबर्डे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. अनिल पाटील धमने हे १९९८ पासून शिवसेना. भाजपा. राष्ट्रवादी काँग्रेस. महात्मा फुले समता परिषद या सह ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व शिवसेना ओबीसी निवड समिती

सदस्य म्हणून तर ते सध्या विद्यमान शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख तर व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघ मुख्य सचिव या पदावर कार्यरत

काम करीत असून त्यांना शासकीय शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव पाहता त्यांनी आजवर केलेल्या

कार्याची दखल घेऊन नॅशनल टेक्नीकल स्टुडंटस आसोशियन NTSA संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिटलर भोसले यांच्या आदेशाने

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भास्कर हंबर्डे यांनी एका छोटे खानी कार्यक्रमात हॉटेल आकृती जुना कौठा नांदेड येथे अनिल पाटील धमने यांची निवड करण्यात आली यावेळी मराठवाडा अध्यक्ष शंकर धिरडीकर मराठवाडा कायदेशिर सल्लागार अॅड चंद्रप्रकाश सांगवीकर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिलानंद सोनकांबळे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदी राम पाटील मुदखेडे आंदीची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी काम करणे, तसेच हे पुर्णपणे सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, औध्योगीक व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणारे संघटन असून, सर्व समाजातील

विद्यार्थ्यांचा कल हा उद्योजकते कडे वळला पाहिजे असा सामाजिक विचार करून संघटन निर्माण करणे व त्याची बांधनी ही एक राजकीय चळवळ नसुन विद्यार्थी संगोपन व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने काम करणारी संघटना आहे.

तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवुण देणे व भटक्या विमुक्त जाती मागासवर्गीय, बहुजन समस्त बांधवांना शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेचे मुख्य उध्दीष्ट असतील असे नियुक्ती पत्रात नमुद केले आहे

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande