बीड - देशमूख कुटूंबियांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून पाच लाखाची मदत
बीड, 28 मार्च (हिं.स.)। भाजपचे दिवंगत नेते एजाजभाई देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पाच लाख रूपयांची मदत मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली, एवढेच नव्हे तर मुस्लिम समाजातील दरवर्षी तीन गरीब मुलींना वैद्यकी
Q


बीड, 28 मार्च (हिं.स.)।

भाजपचे दिवंगत नेते एजाजभाई देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पाच लाख रूपयांची मदत मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली, एवढेच नव्हे तर मुस्लिम समाजातील दरवर्षी तीन गरीब मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत एजाज देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. काल शहरात झालेल्या शोकसभेत ना. पंकजाताई मुंडे यांनी एजाजभाई यांच्या कुटुंबियांच्या

पाठिशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एजाजभाई हे मुंडे यांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अविस्मरणीय

योगदान दिले. अत्यंत शांत आणि सतत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणारे तळमळीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या जाण्याने आपण मुंडे साहेबांच्या शिकवणीवर चालणारा सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे.

एजाज या नावाचा अर्थ अद्भूत सन्मान असा होतो.

त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला आधार देण्याची गरज ओळखून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत देते. याशिवाय मुस्लिम समाजातील गरीब, गरजू व वंचित मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना त्यांनी जाहीर करून दरवर्षी तीन मुलींना यासाठी मदत करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शोकसभेस राष्ट्रीय नेते जमाल सिद्दिकी, आ. संजय केणेकर, योगेश क्षीरसागर, सलीम जहांगीर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, इद्रीस मुलतानी आदींसह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande