नांदेड : पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नका- जिल्हाधिकारी
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अतिरिक्त साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पेट्रोल पंपधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकी
नांदेड : पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नका- जिल्हाधिकारी


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अतिरिक्त साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पेट्रोल पंपधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड तसेच विविध पेट्रोलपंप मालक उपस्थित होते. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही, याबाबत कडक सूचना देण्यात आल्या.

पेट्रोलपंपधारकांच्या सूचनेनुसार रविवारी तेल डेपो सुरू ठेवणे तसेच मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.इंधन टंचाईच्या अफवामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या पॅनिक पर्चेसमुळे काही तासातच पेट्रोल पंपावरील इंधन संपले. परिणामी अफवांमध्ये भरच पडली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर निर्बंध लावले होते. त्यात स्कुटीसाठी २०० रुपये, गिअरच्या दुचाकी ३०० आणि चारचाकी वाहनांसाठी १५०० रुपयापर्यंत इंधन खरेदी करता येणार होते. परंतु सर्वच पेट्रोल पंपावरील रांगा ओसरल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पेट्रोलपंप चालकांची बैठक घेवून सूचना करीत तक्रारी जाणून घेतल्या युद्धामुळे इंधन तुटवडा जाणवणार असल्याची अफवा दोन दिवसापूर्वी नांदेडात पसरली होती. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. शंभर ते दोनशे रुपयांचे पेट्रोल खरेदी करणाऱ्यांनीही वाहनांच्या टाक्या फुल्ल करून घेतल्या होत्या. परिणामी काही तासातच पेट्रोल पंपावर ठणठणाट झाला. प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्याचे आवाहन केल्यानंतरही पॅनिक पर्चेस सुरूच होते. परिणामी इंधन खरेदीवर प्रशासनाला निर्बंध लावावे लागले होते. त्यात वाहनाच्या प्रत्येक प्रकारानुसार इंधन द्यावे, असे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले होते. परंतु, बहुतांश पेट्रोल पंपावरील रांगा ओसरल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande