अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या दोघांवर गुन्हा
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तींनी
अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या दोघांवर गुन्हा


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।

दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तींनी अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली होती. मिशन निर्भया अंतर्गत सपोनि. संजय निलपत्रेवार यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि सायबर सेल, नांदेड यांच्या तांत्रिक मदतीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मुलगी प्रथम गोवा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पुढील शोधात ती एमआयडीसी, सिन्नर (जि. नाशिक) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेऊन सुखरूपपणे तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande