
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनासाठी संकलित डेटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले.
कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जनगणना २०२७ अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक वीरेंद्र दीक्षित, सांख्यिकी अधिकारी मयूर पवार व नेहाल धुरंधरे यांनी जनगणनेची पार्श्वभूमी, प्रक्रिया व संकल्पना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत जनगणना प्रक्रियेचा पाया, अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, तसेच पहिल्या टप्प्यातील घरयादी व ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलन याबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
--------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis