
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। हदगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला असून 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हदगांव येथे 100 नवदांपत्याचा सामूहिक विवाह सोहळा घेण्याचा संकल्प आमदार कोहळीकर यांनी केला आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त नववधू-वरांनी या सामूहिक विवाह मेळावा मध्ये आपले लग्न करायचे असल्यास त्यांनी हिमायतनगर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात जाऊन संपर्क करावा असे आव्हान आमदार कोहळीकर यांनी केले आहे.
विवाह मेळाव्यासाठी नोंदणी हिमायतनगर शहरातील शिवसेना संपर्क कार्यलयात सुरू असून इच्छुक वधू-वरांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी विविध पदाधिकाऱ्यांची समिती कार्यरत असून हिमायतनगर अध्यक्ष म्हणून विजय वळसे, सत्यवृत्त ढोले, बालाजी राठोड यांच्या कडे नावे द्यावे हा विवाह सोहळा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या तर्फे पार पाडण्यासाठी हदगाव शहरात नियोजन केले आहे. शहरासह तालुक्यातील वधू वराना या विवाह सोहळ्या मध्ये अनेक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना विजय वळसे यांनी दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा सामूहिक विवाह मेळावा राबविण्याचा उद्देश आहे सर्व समाजातील तळागाळाच्या घटकापर्यंत ही माहिती पोहोचवून गरजू व्यक्तींच्या आई वडिलांना हा संदेश मिळावा या महागाईच्या काळात लग्न कार्यासाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्चासाठी कर्जबाजारी किंवा आपली शेती विकून घरदार विकून लग्न लावण्याची गरज नसून आमच्या विवाह मेळाव्यात केवळ नोंदणी करून सर्व जबाबदारी मुक्त व्हावे, एखाद्या धनाढ्य माणसाला लाजवेल अशा पद्धतीने व महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सह शिवसेना व महा युतीच्या जिल्ह्यातील व मराठवाड्यातील बड्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार असल्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis