चेक बाऊन्स प्रकरणात व्यापाऱ्यास कारावास व दंडाची शिक्षा
लातूर, 28 मार्च (हिं.स.) । उदगीर येथील न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात आरोपी व्यापाऱ्यास कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. मौजे शहाजानी औराद, ता. निलंगा येथील राहुल ट्रेडिंग कंपनीचे मालक उत्तमकुमार नरसिंगराव सावरे यांनी फेब्रुवारी 2013 मध्ये
चेक बाऊन्स


लातूर, 28 मार्च (हिं.स.) । उदगीर येथील न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात आरोपी व्यापाऱ्यास कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. मौजे शहाजानी औराद, ता. निलंगा येथील राहुल ट्रेडिंग कंपनीचे मालक उत्तमकुमार नरसिंगराव सावरे यांनी फेब्रुवारी 2013 मध्ये उदगीर येथील आडत व्यापारी राधेश्याम नावंदर यांच्याकडून उधारीवर ज्वारी खरेदी केली होती.

या व्यवहाराच्या बदल्यात सावरे यांनी दोन लाख रुपये आणि एक लाख ऐंशी हजार रुपयांचे असे दोन धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेत सादर केल्यानंतर बाउन्स झाल्याने राधेश्याम नावंदर यांनी उदगीर न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी दावे दाखल केले.

सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन न्यायाधीश श्री. झेंडे यांनी आरोपी उत्तमकुमार सावरे यांना प्रत्येक प्रकरणात तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी तीन लाख रुपये दंड ठोठावला.

यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण सहा लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात फिर्यादी राधेश्याम नावंदर यांच्या वतीने अॅड. काळेगोरे (जैन) यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. कलवले, रियाज पटेल, सुशील जाधव आणि मनोज काळेगोरे यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande