पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही निघाला खोटारडा
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। नाशिकच्या भोंदू बाबाची चर्चा असतानाच पुण्यात ''मी महादेवाचा अवतार'' म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पाखंडी बाबाची सध्या एकच चर्चा आहे. स्वयंघोषित धर्म गुरु म्हणणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली.
पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही निघाला खोटारडा


पुणे, 28 मार्च (हिं.स.)। नाशिकच्या भोंदू बाबाची चर्चा असतानाच पुण्यात 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पाखंडी बाबाची सध्या एकच चर्चा आहे. स्वयंघोषित धर्म गुरु म्हणणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धेच्या बिळात लपलेल्या अनेक भोंदू बाबांचे कारनामे उघडकीस येत आहेत.

दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या भोंदू बाबाचा मोठा भाऊही खोटारडाच निघाल्याचं समोर येतंय. सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 सालीच या भोंदू बाबाचे कारनामे उघड झाले होते. त्यावेळी एका मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मात्र, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. तरीही वसईतील काही सामाजिक तरुणांनी या भोंदू बाबाविरोधात सोशल मीडियावर प्रखरपणे आवाज उठवत लिखाण केले होते. याच दरम्यान, आरोपीचे मोठे बंधू वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य हे पुरीच्या शंकराचार्यांचे शिष्य असल्याचा दावा करत असले तरी, भूपेश पाटील यांनी त्यावेळी संबंधित पीठाकडून माहिती घेतली असता असा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे.तसेच, सध्याच्या प्रकरणातील पीडित तरुणीही त्यावेळी भूपेश पाटील यांच्या संपर्कात आली होती. त्यांनी तिला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.या दोन्ही बंधूंविषयी आणखी एक बाब समोर आली असून, घरगुती पूजा-अर्चा करण्याच्या नावाखाली 25 ते 40 हजार रुपये घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande