आधी जलजीवनची कामे पहा, नंतर हस्तांतरण करा सीईओंचे आदेश
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामांत अनियमितता झाल्याचा आरोपानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी आज मेळघाटमधील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांशी व्हीसीव्दारे चर्च
आधी कामे पहा, नंतर हस्तांतरण करा सीईओंचे आदेश ः जलजीवन मिशनचा आढावा


अमरावती, 28 मार्च (हिं.स.)।

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामांत अनियमितता झाल्याचा आरोपानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी आज मेळघाटमधील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांशी व्हीसीव्दारे चर्चा करित तेथील योजनांच्या कामांचा आढावा घेतला. मेळघाटमधील काही गावांमध्ये जुनी पाण्याच्या टाकीची रंगरंगोटी करून नवीन टाकीचे देयके काढण्यात आल्याचा आरोप काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. याशिवाय काही गावांमधील पाण्याच्या टांक्यांमध्ये लिकेजेस होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला. योजना अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा स्थितीत कामे अपूर्ण असल्याचा प्रश्नच येत नाही. मात्र योजनेची कामे झाल्यानंतर हस्तांतरणाच्या वेळी सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आधी संपूण कामाची खातरजमा करावी व नंतरच कामे हस्तांतरित करावी, असे निर्देश सीईओंनी दिले. चिखलदरा तालुक्यातील खडीमल, चिखली, सावरपाणी, केशरपूर, बारूगव्हाण, खिरपाणी, मनभंग, चुनखडी, नवलगाव, मडकी, अंबापाटी, रेट्याखेडा, रायपूर, गांगरखेडा, एकताई, भांडोरा, खोंगडा, आवागढ, माखला, मोथाखेडा, सिंदबन, जामली आर, झिंगापूर, गरजदरी, बिबा, कामापूर, तारूबांदा, पिपल्या, सुमिता, लाखेवाडा, चोबीता, सरवारखेडा, भवई, भांडूम, लवादा भुलोरी, रक्षा, बोरी, कन्हेरी, टेंभू, टेटू, खडकाली, घाना, तोरणवाडी, भामादेही, हतरू, रूईपठार, जारीदा, कामिदा, पांढराखडक, जामली आर, पाटकहू, केली, भिरोजा, मेनघाट, चिलाटी, सलीता बुटीदा, भांडूम गडगा, सिमोरी, बोदू, कुही, बेला, बिहाली, कोटमी आणि माडीझडप आदी गावांतील कामांचा आढावा घेण्यात आला.

जलजीवन मिशनची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. काही ठिकाणी तक्रारी आहेत, मात्र कामे पुर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण करण्यात येऊ नये, असे आदेश आम्ही सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश गावाचे सरपंच आजच्या बैठकीला उपस्थित होते.

- संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी. जिप.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande