नांदेड येथे २९ मार्चला भव्य हिंदू संमेलन; सकल हिंदू समाजाचे आयोजन
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उदात्त उद्देशाने नांदेड शहरात भव्य ''हिंदू संमेलन'' आयोजित करण्यात आले असून, रविवार २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
नांदेड येथे २९ मार्चला भव्य हिंदू संमेलन; सकल हिंदू समाजाचे आयोजन


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उदात्त उद्देशाने नांदेड शहरात भव्य 'हिंदू संमेलन' आयोजित करण्यात आले असून, रविवार २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. सामाजिक एकात्मता, धार्मिक जागृती आणि सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या भव्य संमेलनाला अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, प. पु. प. म. भगवान दादा शेवलीकर (महानुभाव आश्रम, काबरानगर), ह. भ. प. शिवाजी महाराज पावडेवाडीकर, शि. भ. प. ताराबाई बोमनाळे (नायगांव) आणि शि. भ. प. कावेरीताई मुदखेडे (विशालनगर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख श्री शरदराव ढोले (मुंबई) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना धर्म,

संस्कृती आणि राष्ट्रीय मूल्यांच्या जतनाबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ५ वाजून ३० मिनिटांनी भजन कार्यक्रमाने होणार असून, सायंकाळी ६ वाजता मुख्य संमेलनाला प्रारंभ होईल. नांदेड येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भजन, प्रवचन आणि विचारमंथनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची बीजे पेरण्याचा प्रयत्न या संमेलनातून होणार आहे.

'धर्मी रक्षति रक्षितः' या ब्रीदवाक्याने प्रेरित या उपक्रमाला सकल हिंदू समाजाचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असून, शिवाजीनगर, लेबर कॉलनी, गणेशनगर, विजयनगर, यशवंतनगर, फरांदेनगर, विशालनगर, यशोविहार आदी परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे संमेलन सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जागर आणि मूल्यसंवर्धनाचा एक प्रेरणादायी सोहळा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande