कंधार शहरात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास सोमवारी पालिकेवर हांडे मोर्चा
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। मागील अनेक दिवसांपासून कंधार शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. २९ मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास सोमवारी (ता. ३०) पालिकेवर हांडे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष गंगाप
कंधार शहरात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास सोमवारी पालिकेवर हांडे मोर्चा


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।

मागील अनेक दिवसांपासून कंधार शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. २९ मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास सोमवारी (ता. ३०) पालिकेवर हांडे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला दिला आहे.

निवेदनात म्हटले, की शहराच्या एका बाजूला जगतुंग समुद्र, तर दुसऱ्या बाजूला लिंबोटी धरण आहे. शहरास या दोन्ही जलसाठ्यांतून पाणीपुरवठा होतो. परंतु, नगरपालिकेच्या अनियोजित कार्यप्रणालीमुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना चार-चार दिवस पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर भाजपचे शहर मंडळाध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, रमेश लुंगारे, अॅड.

सागर डोंगरजकर, प्रेमानंद गायकवाड, राम निलावाड, गणेश ठाकूर, अभिजित इंदूरकर, शुभम संगनवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande