लातूर मनपाची ‘शास्ती माफी’ योजना
लातूर, 28 मार्च (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा देण्यासाठी शास्ती योजना २०२५-२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल ५० टक्के सूट देण्यात येत आहे. मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की, थकीत करा
महानगरपालिका


लातूर, 28 मार्च (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा देण्यासाठी शास्ती योजना २०२५-२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल ५० टक्के सूट देण्यात येत आहे. मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की, थकीत कराची रक्कम लवकरात लवकर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.

महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपला थकीत मालमत्ता कर भरल्यास शास्तीमध्ये सवलत मिळणार आहे. कर भरण्यासाठी मनपाने QR कोडद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर वसुली वाढवणे आणि नागरिकांना दिलासा देणे या दुहेरी उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांचा मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी उशीर न करता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande