रविवारी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी रविवार दिनांक २९.०३.२०२६ रोजी आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे ''मेगा ब्लॉक'' परिचालीत करेल: मुख्य मार्ग माटुंगा - मुलुंड सकाळी ११.
रविवारी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक


मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी रविवार दिनांक २९.०३.२०२६ रोजी आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे 'मेगा ब्लॉक' परिचालीत करेल:

मुख्य मार्ग

माटुंगा - मुलुंड सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन धिम्या' मार्गावरील गाड्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील; त्यानंतर मुलुंड स्थानकापाशी त्यांना पुन्हा 'डाऊन धिम्या' मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या 'अप धिम्या' मार्गावरील गाड्या मुलुंड येथे 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील; त्यानंतर माटुंगा स्थानकावर त्यांना पुन्हा 'अप धिम्या' मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

ट्रान्स -हार्बर मार्ग : ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर मार्गावरील 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर

ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील सेवा, तसेच

पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या 'अप' मार्गावरील सेवा रद्द राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande