२६४ कोटींचे सावकारी कर्ज, २ लाख ९ हजार कर्जदारांच्या दारात ६६७ सावकार
अमरावती, 28 मार्च (हिं.स.) शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या कारणांपैकी एक सावकारी कर्जाचा विळखा अजूनही चांगलाच घट्ट आहे. कर्जमाफीसारख्या योजना सरकारकडून जाहीर केल्या जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वाढता आलेख कायम आहे. अमरावती जिल
२६४ कोटींचे सावकारी कर्ज २ लाख ९ हजार कर्जदारांच्या दारात ६६७ सावकार


अमरावती, 28 मार्च (हिं.स.)

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या कारणांपैकी एक सावकारी कर्जाचा विळखा अजूनही चांगलाच घट्ट आहे. कर्जमाफीसारख्या योजना सरकारकडून जाहीर केल्या जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वाढता आलेख कायम आहे. अमरावती जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल २६४ कोटी रूपयांचे सावकारी कर्ज वितरीत झाले आहे. बिगर कृषी, तारण व बिगर तारण अशा गोंडस नावाखाली सावकारी कर्जाचे वितरण केल्या जात असले तरी या कर्जाचा मुख्य कर्जदार शेतकरीच राहतो.

शेती कसण्याकरीता पिक कर्जाची सोय असली तरी बँकींग प्रक्रियेतील अडथळे, कागदपत्रांची गुंतागुंत व वेळेवर न मिळणारे कर्ज यामुळे नाईलाजाने शेतकरी सावकारांच्या दारात जाऊन कर्जाच्या विळख्यात अजकतो. जिल्ह्यातील एकूण ६६७चौदाही तालुक्यात परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्या माध्यमातून २६४.३० कोटी रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. सहकार विभागाने दिलेल्या या अधिकृत माहितीपेक्षाही प्रत्यक्षात अवैधसावकारांचे जाळे अधिक मोठे आहे. बँकांकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ व क्लिष्ट असल्याने अनेक शेतकरी हंगामी गरजेसाठी तातडीने सावकारांकडून कर्ज घेतात. पीककर्जासाठी साधारणतः तारण कर्जासाठी ९ टक्के, विना तारण कर्जासाठी १२ टक्के व्याज आकारले जाते. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक दराने कर्जवसूली केल्या जाते.

जिल्ह्यात ६७७ सावकार

सहकार विभागाकडे जिल्ह्यात ६६७ परवानाधारक सावकार आहेत. सावकारांची सर्वाधिक संख्या अमरावती तालुक्यात २५० व अचलपूर तालुक्यात १५३ आहे. सर्वात कमी संख्या भातकुली तालुक्यात ९ इतकी आहे. मोर्शी ३३, अंजनगावसुर्जी २३, धामणगावरेल्वे ३३, वरूड ४४, धारणी २१, नांदगाव खंडेश्वर १४, चांदूर रेल्वे ११, चांदूर बाजार ४३, तिवसा १९ व दर्यापूर तालुक्यात १४ सावकारी परवाने आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande