नांदेडमध्ये स्थापन होणार 'ड्रायलँड रिसर्च सेंटर', खा. डॉ. गोपछडे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी नांदेड येथे ड्रायलँड रिसर्च सेंटर (कोरडवाहू शेती संशोधन केंद्र) स्थापन होणार आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी संसदेत ही महत्
नांदेडमध्ये स्थापन होणार 'ड्रायलँड रिसर्च सेंटर', खा. डॉ. गोपछडे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी नांदेड येथे ड्रायलँड रिसर्च सेंटर (कोरडवाहू शेती संशोधन केंद्र) स्थापन होणार आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी संसदेत ही महत्त्वपूर्ण मागणी लावून धरली. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकार अशा संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी पावले उचलणार असल्याचा विश्वास दिला आहे.

मराठवाड्यात कमी पर्जन्यमान आणि जमिनीची कमी जलधारण क्षमता असल्यामुळे या भागातील शेतीचा विकास खुंटला असून, विकासाच

अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही. हैदराबाद येथील 'सीआरआयडीए' सारख्या मोठ्या संस्थांपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोहोच मर्यादित असल्याने, नांदेडमध्येच त्याची शाखा किंवा केंद्र व असावे, असा प्रभावी मुद्दा खा. डॉ. गोपछडे यांनी मांडला. यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळून त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि मराठवाडा आर्थिक सामाजिकदृष्ट्या प्रगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार अवर्षणग्रस्त भागांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक हवामान अनुकूल पिकांच्या जाती आणि ८६ क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, यामुळे उत्पादनात ८२ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. पुढील टप्प्यात नांदेडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी संशोधन केंद्रांच्या विस्तारावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande