अमरावतीच्या चित्रा कॉलनीत देहव्यापारावर पोलिसांचा छापा; चार जण ताब्यात
अमरावती, 28 मार्च (हिं.स.) | फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम रोड चित्रा कॉलनीमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान अनैतिक कृत्ये उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उ
अमरावतीच्या चित्रा कॉलनीत देहव्यापारावर पोलिसांचा छापा; चार जण ताब्यात


अमरावती, 28 मार्च (हिं.स.) | फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम रोड चित्रा कॉलनीमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान अनैतिक कृत्ये उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एक युवक आणि ३ महिलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळधाम कॉलनी परिसरातील एका घरात गेल्या काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकरणी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस आणि भरोसा सेलच्या संयुक्त पथकाने या कारवाईत तीन महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव सुदेश शेंडे आहे. झडतीदरम्यान, अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर मंगलधाम रोडवरील चित्रा कॉलनी परिसरात खळबळ उडाली असून रहिवासी चितेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवैध धंद्यामागे विशाल नावाचा एक व्यक्ती आहे. या नेटवर्कमध्ये इतर व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपास सुरू असून लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले असून परिसरात नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande