नांदेडमध्ये कुत्र्याचा पिसाळलेल्या तीन मुलांवर हल्ला, गायीलाही घेतला चावा
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक धुमाकूळ घालत गल्लीबोळात खेळणाऱ्या तीन लहान मुलांवर चावा घेतल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बारडमध्ये घडली. गावात पिसाळलेल्या कुत्र्याने ज्ञानदीपनगर येथील संगज्ञ कैलास पानबुडे (वय १७), ग
नांदेडमध्ये कुत्र्याचा पिसाळलेल्या तीन मुलांवर हल्ला, गायीलाही घेतला चावा


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।

पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक धुमाकूळ घालत गल्लीबोळात खेळणाऱ्या तीन लहान मुलांवर चावा घेतल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बारडमध्ये घडली.

गावात पिसाळलेल्या कुत्र्याने ज्ञानदीपनगर येथील संगज्ञ कैलास पानबुडे (वय १७), गुंफा गल्ली येथील गौरी मधुकर सोनटक्के (वय ६) आणि जोहान फिरोज शेख (वय ३) यांना चावा घेतला. यानंतर तिघांना ग्रामीण रुग्णालयात रेबीज इंजेक्शन देऊन उपचार सुरू आहेत. यानंतरगुंफा गल्लीतून मुलगी वडिलासोबत डबा घेऊन दुकानाकडे जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने दोन ते तीन ठिकाणी चावा घेतला. रेबीज इंजेक्शन देऊन उपचार सुरू असले तरी मुलीला कुत्र्याबद्दल भीती वाटते.

श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी जात असताना कुत्र्याच्या हल्ल्यात घायाळ झाला. गावात मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला असून, ग्रामपंचायतीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

गावात वाकड वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला, ज्यामुळे १८ वर्षीय निष्पाप युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. गाव पातळीवरील रक्षक नेमण्यात आले होते, परंतु ग्रामपंचायतीने वानररक्षकाची नियुक्ती रद्द केल्याने नागरिकांना घरातील दरवाजे बंद करून सुरक्षित राहावे लागले. नितीन आनंदराव जाधव यांच्या गायीला कुत्र्याने चावा घेतला होता.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande