
बीड, 28 मार्च (हिं.स.)।
बीड शहरातील
पेठ बीड भागातील रहिवाशी असलेले प्रमोद क्षीरसागर यांची पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षक पदी बीडचे भूमिपुत्र प्रमोद क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रमोद क्षीरसागर यांनी नवी मुंबई येथील पनवेल पोलीस स्टेशन, पुणे पिंपरी चिंचवड भागातील हिंजवडी, वाकड, चतुशिंगी, तळेगाव दाभाडे चाकण, आळेफाटा, शिक्रापूर या पोलीस स्टेशनला अतिशय उत्कृष्ट काम केलेलं असून विविध आव्हानात्मक व किचकट गुन्ह्यांतील आरोपीचा शोध लावलेला आहे. पुणे परिसरात दांडगा जनसंपर्क व गरजवंतांना आवश्यक ती मदत करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis