गायराण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ३० मार्चला मोजणी
बीड, 28 मार्च (हिं.स.)। पाटोदा शहरातील गट क्रमांक ७१५ या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, सदर जमिनीवरील अतिक्रमण सहा महिन्यांच्या आत निष्कासित
गायराण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ३० मार्चला मोजणी


बीड, 28 मार्च (हिं.स.)।

पाटोदा शहरातील गट

क्रमांक ७१५ या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, सदर जमिनीवरील अतिक्रमण सहा महिन्यांच्या आत निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेचा भाग म्हणून ३० मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता या क्षेत्राची शासकीय मोजणी निश्चित करण्यात आली आहे. या बाबत संबंधितांना तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयाने नोटीस

बजावली आहे.

या अतिक्रमण प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अॅड .एन.एल. जाधव यांच्यामार्फत शेख मोबीन हमीद व रियाज युसूफ सय्यद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पी.आय.एल. क्र. २७/२०२५) सुनावणी करताना न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी हे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी बीड आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या पत्रांनुसार, आता प्रत्यक्ष कारवाईला वेग आला आहे. तहसीलदार कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयामार्फत या जमिनीशी संबंधित सर्व संस्था आणि

व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली

आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande