महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खरात व हरीगिरी या भोंदू महाराजांवर कठोर कारवाईची मागणी
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। नाशिक येथील भोंदू अशोक खरात आणि नांदेड येथील हरीगिरी दत्तगिरी या भोंदूच्या प्रकरणाच्या अनुषंगाने अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध राज्यस्तरावर कठोर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जि
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खरात व हरीगिरी या भोंदू महाराजांवर कठोर कारवाईची मागणी


नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। नाशिक येथील भोंदू अशोक खरात आणि नांदेड येथील हरीगिरी दत्तगिरी या भोंदूच्या प्रकरणाच्या अनुषंगाने अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध राज्यस्तरावर कठोर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली.

नाशिक येथील अशोक खरात या भोंदू बावा ने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. याच्यावर लैंगिक शोषण, आर्थिक शोषण, बुवाबाजी व अंधश्रद्धा विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी पाच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर नांदेड येथील हरीगिरी दत्तगिरी या भोदू बाबांवर भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये महिला अत्याचार विरोधी गुन्हा नोंदविला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींची बुवाबाजी हे एका व्यक्तीचे कृत्य राहू शकत नाही. तर त्यामध्ये आर्थिक स्वार्थ, राजकीय तसेच प्रशासकीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असू शकते. म्हणून हे प्रकरण सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण आणि बुवाबाजी या धोकादायक संगणमताचे उदाहरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपूर्ती मर्यादित न ठेवता त्यामागील

संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. करिता -

1. निष्पक्ष, राजकीय आणि प्रशासकीय दवाव विरहित तपास व्हावा. 2. महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

3. जादूटोणाविरोधी वरील कायद्यात लोकांचे शोषण व दिशाभूल

करणाऱ्या फलज्योतिपाचाही समावेश करण्यासाठी शासनाने कायदा

दुरुस्ती करावी.

4. पीडित महिलांना मानसिक सामाजिक संरक्षण देऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवावी.

5. आरोपी सोबत संबंधित असलेले विविध राजकीय नेते, अधिकारी व प्रभावशाली व्यक्तींची चौकशी करण्यात यावी. दोपी

आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

6. भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या कलम क्रमांक 51 ज नुसार, शाळा व महाविद्यालयां मध्ये व्यापक जनजागृती अभियान राबवून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करावा.

7. अशोक खरात आणि हरीगिरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात असू शकतात. तरी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन राज्यव्यापी तपास करावा.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande