
लातूर, 28 मार्च (हिं.स.)। जैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर व अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकानिमित्त लातूर येथे जैन मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जैन मंडळाचे अध्यक्ष संजय बोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. कार्यक्रम यशस्-वीपणे पार पाडण्यासाठी मिरवणूक समिती, व्यासपीठ समिती, स्वागत समिती, प्रसाद समिती, प्रसिद्धी समिती आदी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महोत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हेमंत बोरा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ७.०० वाजता श्री दिगंबर जैन मंदिर, लाड गल्ली येथून भव्य प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. ही प्रभात फेरी खडक हनुमान जीवराज भवन सुभाष चौक गंजगोलाई हनुमान चौक मार्गे चंद्रनगर येथील वर्धमान उद्यान येथे विसर्जित होईल. वर्धमान उद्यान येथे सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सुश्रावक व सामाजिक कार्यकर्ते श्री लालूतभाई शहा यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षात जैन समाजातील डॉक्टर, सीए, इंजिनिअर तसेच उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर जी-वराज भवन येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत तसेच श्री दिगंबर जैन मंदिर येथे दुपारी १.३० ते ४.३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis