
बीड, 29 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र कुस्तीगीर संघ
आयोजित पुण्यातील वाघोली येथे झालेल्या ६८ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ९२ किलो वजनी गटातील गादी विभागात येथील भगवान महाविद्यालयाच्या बी.एस्सी. तृतीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी अमोल डिगांबर दिंडे याने पुण्याच्या यशराज चोरमले याच्यावर मात करून महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धेतील कांस्यपदक पटकावले.
अमोल महाविद्यालयाच्या बाबाजी कुस्ती संकुलात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे बीड जिल्हा सचिव, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली हा भगवान
वर्षापासून कुस्तीचे धडे घेत असून, त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. दीपक टेकाडे, माजी आमदार भीमराव धोंडे, अजय धोंडे, युवा नेते अभय धोंडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. बापू तोरडमल यांनी कौतुक केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis