२२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट. सर्वसाधारण विजेतेपद आणि डेमो प्रकारातही विजेतेपद
Maharashtra wins double crown in the 22nd National Jump Rope Championship. Overall title and also in the demo category.
Maharashtra wins double crown


दिल्लीला दुसरा तर हरियाणाला तिसरा क्रमांक

नाशिक, 29 मार्च (हिं.स.)

नाशिक जिल्हा जम्प-रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प-रोप असोसिएशन यांच्या वतीने आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आज शानदार समारोप झाला.जेष्ठ क्रीडा संघटक चंद्रशेखर सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध वैयक्तिक प्रकारात चांगली कामगिरी करत पदकांची लयलूट केली, तर डेमो या सांघिक प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत सुंदर डेमो पेश करत २७ गुणांसह डेमो प्रकारातही सुवर्णपदक पटकावले. डेमो प्रकारात दिल्लीच्या संघाने दुसरे तर मध्यप्रदेश संघाने तिसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या या एकत्रित प्रत्यनामुळे महाराष्ट्राने ६४ गुणांसह या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नांव कोरले. दिल्लीच्या खेळाडूंनी चांगला प्रयत्न करून ४८ गुण मिळवत द्वितीय स्थान पटकावले, तर हरियाणा संघाच्या खेळाडूंनीही उत्तम कामगिरी करत २९ गुणांसह तिसरे स्थान मिळविले.विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे वैष्णवी डेव्हलपर्स तथा, वानखेडे रिऍलिटी प्रा. लि.चे चेअरमन उमेश वानखडे,आर. डी. ग्रुपचे संचालक तथा नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या हस्ते आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आकर्षक चषक आणि मेडल्स प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी बोलतांना उमेश वानखडे यांनी सांगितले की, खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या देशाचे नांव जगभरात उंच करावे असे सांगून विजेत्या खेळाडूंसह सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

*स्पर्धेचा अंतिम निकाल :-* १) सर्वसाधारण विजेतेपद - महाराष्ट्र संघ ( ६४ गुण) २) सर्वसाधारण उपविजेतेपद - दिल्ली संघ ( ४८ गुण) ३) सर्वसाधारण तृतीय क्रमांक - हरयाणा संघ - (२९ गुण) *डेमो - सांघिक प्रकार* १) महाराष्ट्र संघ - विजेतेपद -( २७ गुण) २) दिल्ली संघ - उपविजेता ( १९ गुण) ३) मध्य -प्रदेश - तृतीय क्रमांक (१२ गुण)

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande