आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र जाहीर
गुवाहटी, 31 मार्च (हिं.स.) : आसामच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, मंगळवारी आपले निवडणूक घोषणापत्र जाहीर केले आहे. या घोषणापत्रात समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याचा आणि ''अरुणोदय'' योजनेअंतर्गत महिलांना मासिक 3 हजार रुपये देण्याच्या
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र जाहीर


गुवाहटी, 31 मार्च (हिं.स.) : आसामच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, मंगळवारी आपले निवडणूक घोषणापत्र जाहीर केले आहे. या घोषणापत्रात समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याचा आणि 'अरुणोदय' योजनेअंतर्गत महिलांना मासिक 3 हजार रुपये देण्याच्या वचनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सरमांसह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, सर्बानंद सोनोवाल आणि राज्य भाजपा अध्यक्ष दिलीप सैकिया उपस्थित होते.

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी आगामी 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. त्यानुषंगाने भाजपने जाहीर केलेल्या निवडणूक घोषणापत्राबाबात राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की भाजपाचे लक्ष्य असमला सर्वात चमकदार राज्य बनवणे आहे. त्यांनी उत्तराखंड आणि गुजरातच्या यशस्वी मॉडेलचा अवलंब करत यूसीसी लागू करण्याचे तसेच कथित 'लव जिहाद' विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की यूसीसीमध्ये संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांचा समावेश केला जाणार नाही आणि आदिवासी समुदायांवर हे लागू होणार नाही. आसमला सर्वोत्कृष्ठ राज्य बनवू इच्छितो. तसेच राष्ट्रनिर्माणात भाग घेऊ इच्छितो. घोषणापत्रात 31 आश्वासनांचा समावेश केला आहे. आसममध्ये समान नागरी कायदा लागू करू, ज्यात सहावी अनुसूची आणि एसटी समाविष्ट नाहीत. आम्ही 'लव जिहाद' विरोधात कठोर पावले उचलू. आसमला पूरमुक्त करण्याचा प्रयत्न करू आणि पहिले दोन वर्षांत 18 हजार कोटी रुपये खर्च करू असे घोषणापत्रात नमूद केले आहे.

यासोबतच भाजपने 'लखपति दीदी' योजनेअंतर्गत 40 लाख महिलांना लखपति बनवण्याचा उद्देश साधत प्रत्येक महिलेला 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आगामी 5 वर्षांत 2 लाख नोकऱ्यांची निर्मिती, 'एक जिल्हा, एक मेडिकल कॉलेज, एक विद्यापीठ, एक अभियांत्रिकी कॉलेज' प्रकल्प आणण्याचा मानस. 'अरुणोदय योजना' अंतर्गत 1,250 रुपयांची रक्कम वाढवून 3 हजार रुपये करण्याचा प्रयत्न असल्याचे हिंमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande