दारूच्या नशेत पोटच्या मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या
बीड, 31 मार्च, (हिं.स.)। आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात एका १९ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल सजन मुळे (वय ५०) असे या घटनेतील मृत पित्याचे नाव असून, आरोपी मुलगा किरण मुळ
अ


बीड, 31 मार्च, (हिं.स.)। आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात एका १९ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल सजन मुळे (वय ५०) असे या घटनेतील मृत पित्याचे नाव असून, आरोपी मुलगा किरण मुळे याने दारूच्या नशेत हे कृत्य केले.

मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असलेले हे कुटुंब कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झाले होते. पहाटे वडील गाढ झोपेत असताना किरणने अचानक त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला, ज्यामध्ये अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. व्यसनाधीनतेपोटी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande