कोल्हापूर : सीमाशुल्क विभागाकडून तस्करी करणाऱ्या चौघांना अटक
कोल्हापूर, 31 मार्च (हिं.स.) । कोल्हापूरजवळ किणी टोल नाक्याजवळ पुणे सीमाशुल्क विभागाने बिबट्याची कातडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान दोन बिबट्याची कातडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किया सेल्टस कार आणि महत
कोल्हापूर : सीमाशुल्क विभागाकडून तस्करी करणाऱ्या चौघांना अटक


कोल्हापूर, 31 मार्च (हिं.स.) । कोल्हापूरजवळ किणी टोल नाक्याजवळ पुणे सीमाशुल्क विभागाने बिबट्याची कातडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान दोन बिबट्याची कातडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किया सेल्टस कार आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून काही लोक बिबट्याची कातडी अवैधपणे वाहून नेण्याचा आणि विकण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सीमाशुल्क अधीक्षक (प्रतिबंधात्मक आणि गुप्तचर) हिमांशू शर्मा यांनी पथक तयार करून पुणे-बंगळूरू महामार्गावर किणी टोल नाका परिसरात तपासणी मोहिम राबवली.

कोल्हापूर शहराजवळील महामार्गावर करण्यात आलेल्या या जलद कारवाईदरम्यान, दोन बिबट्याची कातडी, एका किया सेल्टस वाहनासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त करण्यात आल्या. या चार आरोपींपैकी दोघे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे रहिवासी असून, इतर दोघे सातारा आणि लातूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

या मोहिमेत अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर आणि संदीप कौशिक, निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, ऋतिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा, प्रमुख हवालदार संजय एम जाधव आणि हवालदार अभिषेक यादव यांनी नेतृत्व केले.

ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना कोल्हापूर येथील वडगाव न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात आले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande