भाजपाकडून राज्यसभेवर आठवले, तावडेंंसह चौघांना संधी
मुंबई, 04 मार्च (हिं.स.) - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्
आठवले तावडे माया ईवनाते रामराव वडकुते


मुंबई, 04 मार्च (हिं.स.) - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांमध्ये शरद पवार, रामदास आठवले (रिपाइं), फौजिया खान (श.प. गट), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप)

सामाजिक आणि प्रादेशिक समतोल

भाजपने माया ईवनाते आणि रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. रामराव वडकुते यांच्या रूपाने ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्या रूपाने एक आक्रमक आणि अनुभवी मराठा नेता संसदेत पाठवला जात आहे.

रामदास आठवले - केंद्रीय मंत्री आणि रिपाइं (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले यांना भाजपने आपल्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी दिली आहे.

विनोद तावडे - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे या निमित्ताने संसदेत पुनरागमन होत आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

माया चिंतामण इवनाते - नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या आदिवासी महिला नेत्या माया ईवनाते यांना उमेदवारी देऊन पक्षाने आदिवासी समाजाला मोठे प्रतिनिधित्व दिले आहे.

रामराव वडकुते - धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनाही राज्यसभेची संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधली आहेत.

राज्यसभेसाठी इतर राज्यातील भाजपचे उमेदवार पाहिल्यास बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार, आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन, छत्तीसगड : लक्ष्मी वर्मा, हरियाणा : संजय भाटिया, ओरिसा : मनमोहन सामल, सुजीत कुमार आणि पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत, 6 मार्च – अर्जांची छाननी, 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख, 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande