अमरावती : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी १५ कैद्यांविरुद्ध गुन्हा
अमरावती, 04 मार्च (हिं.स.)। अमरावती कारागृहातील १५ कैद्यांनी पॅरोल रजा मिळण्याकरिता बनावटी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अखेर सायंकाळी १५ कैद्यांविरुध्द गुन्हा नोंदविला.अमरावती मध्यवर्ती कारागृहातील अनेक कैदी पॅरोल र
बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात १५ कैद्यांविरुद्ध गुन्हा


अमरावती, 04 मार्च (हिं.स.)।

अमरावती कारागृहातील १५ कैद्यांनी पॅरोल रजा मिळण्याकरिता बनावटी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अखेर सायंकाळी १५ कैद्यांविरुध्द गुन्हा नोंदविला.अमरावती मध्यवर्ती कारागृहातील अनेक कैदी पॅरोल रजा घेतात आणि ठरल्याप्रमाणे कारागृहात हजर राहतात. दरम्यान कारागृहातील १५ कैद्यांनी २०२४-२०२५ दरम्यान अभिवचन रजा मिळण्याकरिता कारागृह अधिक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु त्यांनी अर्ज नामंजूर केल्यामुळे कैद्यांनी कारागृह विभागाचे महानिरीक्षकयांच्याकडे अर्ज सदर केला होता. परंतु त्यांनी सुध्दा नामंजूर केल्यामुळे १५ कैद्यांनी नागपूर येथील उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती कारागृह अधिक्षकाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. संबंधित कैद्यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे त्यांची रजा नामंजूर करण्यात आली असे कारागृह अधिक्षकांनी न्यायालयास सांगितले. त्यावरून न्यायालयाने कारागृह प्रशासनाला चांगलेच सुनावले, कैद्यांनी खोटी कागदपत्रे सादर केले तर तुम्ही त्यांच्याविरुध्द गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न विचारला. खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कैद्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची नोटीस कारागृह अधिक्षकाला बजावली होती. त्यामुळे कारागृह अधिकाऱ्यांनी कैद्यांनी सादर केलेली कागदपत्रे जमा केली आणि ७ फेब्रुवारीला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात १५ कैद्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याकरिता गेले. पोलिसांनी त्या सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता घटना, तारीख आणि वेळ त्यामध्ये नव्हते. त्यामुळे कशाच्या आधारावर गुन्हा दाखल करावा असा प्रशन फ्रेजरपुरा पोलिसांसमोर होता. एक ते दिड तास अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पाहणी केली. ज्या कैद्यांनी अभिवचन रजा मागितली होती, त्यांच्याविरोधात कारागृह प्रशासनाकडे ठोस कागदपत्रे नव्हती, त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास साफ नकार दिला होता. तेव्हापासून कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कैद्यांनी दिलेल्या प्रत्येक कागदाची व वैद्यकीय प्रमाणपत्राची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिऱ्यांच्या भेटी घेतल्या. तेव्हा सादर केलेली सर्व वैद्याकीय प्रमाणपत्रे बनावटी असल्याचे उघड होताच कारागृहातील प्रभारी अधिक्षक विलास भोईटे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी १५ कैद्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande