अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’च्या दिशेने निर्णायक पाऊल
डीव्हीओआर/एचपी-डीएमई प्रणालींचे फ्लाइट कॅलिब्रेशन यशस्वीअमरावती, 05 मार्च (हिं.स.)।अमरावती विमानतळावर रात्रीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून DVOR/HP-DME या आधुनिक नेव्हिगेशन प्रणालींचे फ्लाइट कॅलिब्रेशन यशस्वी
Decisive step towards ‘night landing’ at Amravati Airport; Flight calibration of DVOR/HP-DME systems successful


डीव्हीओआर/एचपी-डीएमई प्रणालींचे फ्लाइट कॅलिब्रेशन यशस्वीअमरावती, 05 मार्च (हिं.स.)।अमरावती विमानतळावर रात्रीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून DVOR/HP-DME या आधुनिक नेव्हिगेशन प्रणालींचे फ्लाइट कॅलिब्रेशन यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) केली आहे. आणि गेल्या दोन दिवसांत हा कॅलिब्रेशन सराव पार पडला. या प्रक्रियेमुळे अमरावती विमानतळावर भविष्यात नाईट लँडिंग ऑपरेशन्स सुरू करण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.एमएडीसीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) सहकार्याने ही चाचणी पूर्ण केली. एएआयच्या फ्लाइट इन्स्पेक्शन युनिट (FIU), आरसीडीयू आणि सीएनएस संचालनालय यांच्या समन्वयातून ही उड्डाण तपासणी पार पडली. विशेष तांत्रिक विमानाच्या सहाय्याने विमानतळाच्या नेव्हिगेशन प्रणालींची अचूकता, सिग्नल स्थिरता आणि कार्यक्षमता तपासण्यात आली.DVOR (डॉप्लर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओम्नी रेंज) आणि HP-DME (हाय पॉवर डिस्टन्स मेजरिंग इक्विपमेंट) या प्रणाली विमानांना अचूक दिशा आणि अंतराची माहिती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. विमानतळावर सुरक्षित आणि अचूक लँडिंगसाठी या प्रणालींची कार्यक्षमता जागतिक मानकांनुसार असणे आवश्यक असते. या उड्डाण चाचणीत प्रणालींची कार्यक्षमता आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) निर्धारित मानकांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.उड्डाणानंतरच्या प्रमाणीकरण प्रक्रियेत DVOR प्रणालीमुळे विमानांना अचूक दिशादर्शक सिग्नल मिळत असल्याचे आणि HP-DME प्रणालीमुळे विमानाचे धावपट्टीपासूनचे अंतर अचूकपणे मोजता येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विमानतळाच्या नेव्हिगेशनल विश्वासार्हतेत मोठी वाढ होणार आहे. या प्रगत प्रणालीमुळे खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही पायलटला सुरक्षितपणे मार्गदर्शन मिळू शकते.या यशस्वी कॅलिब्रेशनमुळे अमरावती विमानतळाची ऑपरेशनल क्षमता वाढण्यास मदत होणार असून प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यास विमानसेवांचे वेळापत्रक अधिक लवचिक होईल आणि प्रवासी तसेच उद्योग क्षेत्रासाठी विमानतळ अधिक उपयुक्त ठरेल.एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले की, “अमरावती विमानतळावर डीव्हीओआर आणि एचपी-डीएमई प्रणालींचे यशस्वी उड्डाण कॅलिब्रेशन हे नेव्हिगेशनल अचूकता आणि ऑपरेशनल लवचिकता वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. मजबूत सीएनएस पायाभूत सुविधा ही सुरक्षित आणि कार्यक्षम हवाई ऑपरेशन्सचा कणा असते. या टप्प्यामुळे केवळ जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन बळकट होत नाही, तर रात्रीच्या विमान उड्डाणांच्या तयारीलाही वेग मिळतो.”त्यांनी पुढे सांगितले की, एमएडीसीकडून विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यास संस्था कटिबद्ध आहे.या यशस्वी चाचणीमुळे अमरावती विमानतळ लवकरच नाईट लँडिंग सुविधेसह अधिक सक्षम विमानतळ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande